Mumbai, मार्च 9 -- India vs New Zealand, Final Todays Match : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची फायनल आज (९ मार्च) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल.

अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय संघ त्याच प्लेइंग-११ सह मैदानात उतरेल.

या सामन्यात भारतीय संघ ४ विशेषज्ञ फलंदाज, १ यष्टीरक्षक फलंदाज, १ फलंदाजी अष्टपैलू, २ फिरकी गोलंदाजी अष्टपैलू, १ विशेषज्ञ वेगवान गोलंदाज आणि २ विशेषज्ञ फिरकीपटूंसह मैदानात उतरला आहे.

तर दुसरीकडे, किवी संघात वेगवान गोलंदाज नॅथन स्मिथ प्लेइंग इलेव्हनमध्ये आला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्री दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर आहे. न...