Mumbai, मार्च 9 -- India vs New Zealand, Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळली गेली. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

भारतासमोर विजयासाठी २५२ धावांचे लक्ष्य होते, जे त्याने ४९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले.

भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. २००२ मध्ये भारतीय संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनला होता. त्यावेळी भारताने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे जेतेपदाची कमाई केली होती. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१३ साली चॅम्पियन बनला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला आहे.

तत्पूर्वी, लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहि...