Mumbai, मार्च 9 -- Champions Trophy 2025, IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज (९ मार्च) भारत आणि न्यूझीलंडचे संघ भिडणार आहेत. उभय संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. आता प्रश्न असा आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तब्बल १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकू शकेल का?

वास्तविक, न्यूझीलंडला हरवणे भारतीय संघासाठी सोपे नसेल, असे मानले जात आहे. मात्र, याआधी भारताने ग्रुप स्टेज मॅचमध्ये न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र टीम इंडियासाठी मोठा धोका ठरू शकतो, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

वास्तविक, भारतीय वंशाच्या रचिन रवींद्रची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. फलंदाजीशिवाय या खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ...