Mumbai, मार्च 9 -- रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या जेतेपदाच्या अगदी जवळ आला आहे. आज रविवारी (९ मार्च) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

रोहितसोबतच विराट कोहलीसाठीही हा सामना महत्त्वाचा असेल. जर आपण भारताच्या विजयाच्या घटकांबद्दल बोललो तर ते विजेतेपदावर कब्जा करू शकतो. यामध्ये तीन घटक महत्त्वाचे ठरू शकतात.

रेकॉर्डवर नजर टाकली तर टीम इंडियाचा न्यूझीलंडवर वरचष्मा दिसतो. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण ११९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यात भारताने ६१ सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत.

भारतीय संघ आता पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारताने ग्रुप मॅचमध्ये न्यूझीलंडचा वाईट पद्धतीने पराभव केला हो...