भारत, नोव्हेंबर 25 -- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना आज (२५ नोव्हेंबर) ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. शेवटच्या काही षटकात वॉशिंग्टन सुंदरने वेगाने धावा करत भारताची धावसंख्या ३०० च्या पुढे नेली. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ८० धावा केल्या. शिखर धवन आणि शुभमन गिल यांनीही अर्धशतकी खेळी केली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात संथ पण भक्कम झाली. कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. यानंतर दोन्ही फलंदाज एकाच षटकात बाद झाले. येथून न्यूझीलंडला पुनरागमनाची संधी मिळाली. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी ३२ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला, परंतु लॉकी फर्ग्युसनने ...