Mumbai, मार्च 9 -- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी २५२ धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेल (नाबाद ५३) आणि डॅरिल मिचेल (६३) यांनी अर्धशतके झळकावली.

हा सामना दुबईच्या त्याच खेळपट्टीवर खेळला जात आहे, ज्या पीचवर भारत-पाकिस्तान सामना झालाहोता. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा डॅरिल मिशेलने केल्या, ज्याने ६३ धावांची संथ पण अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली.

आता तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनण्यासाठी भारतीय संघाला २५२ धावा कराव्या लागतील. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ख...