भारत, डिसेंबर 8 -- भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला आहे. तो पुढील उपचारांसाठी भारतात परतत आहे. तर १४ डिसेंबरपासून भारताला बांगलादेश विरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत ही मालिका जिंकावी लागणार आहे. दुखापतग्रस्त रोहित शर्माचा बॅकअप म्हणून बंगालचा युवा सलामीवीर अभिमन्यू इसवरनचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

अभिमन्यू इसवरन सध्या बांगलादेशमध्येच असून भारत-अ संघाचा कर्णधार आहे. सलामीवीर म्हणून बांगलादेश-अ विरुद्धच्या दोन्ही अनधिकृत कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले आहे.

अभिमन्यू इश्वरनचा रेकॉर्ड

२७ वर्षीय अभिमन्यू ईश्वरने फर्स्ट क्लास, लिस्ट-ए आणि टी-२० मध्ये एकूण २५ शतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत त्याच्याकडे ...