भारत, फेब्रुवारी 13 -- केंद्र सरकारने आयकर विधेयक २०२५ (Income-Tax Bill 2025) चा मसुद्या जाहीर केला आहे. या मसुद्यामध्ये 'पगार' या शब्दाची व्याख्या करण्यात आली असून या श्रेणीअंतर्गत करपात्र असलेल्या उत्पन्नाचा अर्थ सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विधेयकाचा मसुदा लवकरच संसदेत मांडला जाणार आहे. तथापि, या नव्या आयकर कायदातही काही बदल केले जाऊ शकतात. जुना, १९६१ सालचा आयकर कायदा पुढील वर्षी पूर्णपणे बदलण्यापूर्वी नव्या कायद्यात सुधारणा केल्या जाऊ शकतात, असं बोललं जात आहे.

दरम्यान, पगारावरील कर आकारणीसाठी उत्पन्न कसे परिभाषित करण्यात आले आहे, पगारामध्ये कोणत्या प्रकारच्या उत्पन्नाचा समावेश केला गेला आहे, हे येथे समजून घेऊ या.

करदात्यांनी मिळवलेल्या कोणत्याही उत्पन्नावर वेगवेगळ्या श्रेणीखाली कर आकारला जातो. नव्या आयकर विधेयकात मिळकती...