Mumbai, फेब्रुवारी 1 -- Income Tax New Regime : निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा करताना म्हटले की, १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या लोकांना आयकर भरावा लागणार नाही. या घोषणेमुळे मध्यमवर्गीय पगारदारांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे आणि अपेक्षेप्रमाणे अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या 'मोठा दिलासा' दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

एका एक्स युजरने लिहिले की, 'बजेट २०२५ : ए गेम-चेंजर फॉर द मिडल क्लास'. मध्यमवर्गीयांना हा मोठा दिलासा आहे, असे आणखी एकाने म्हटले आहे. तिसऱ्याने टाळ्या वाजवून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चौथ्याने लिहिलं, 'वाह, मला हे अजिबात अपेक्षित नव्हते.' काहींना तर इतका आनंद झाला आहे की, त्यांनी मीम्स...