New Delhi, फेब्रुवारी 1 -- Income Tax in Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाकडं डोळे लावून बसलेल्या देशातील कोट्यवधी मध्यमवर्गीयांना मोदी सरकारनं आज मोठी आनंदाची बातमी दिली. प्राप्तिकराच्या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली. त्यानुसार, यापुढं १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न थेट करमुक्त असेल.

निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडला. या बजेटकडून मध्यमवर्गीयांना मोठ्या अपेक्षा होत्या. किमान १० लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं जावं अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र, केंद्र सरकारनं तेवढ्यावरच न थांबता करदात्यांना 'आनंदाचा बोनस' दिला आहे. सरकारनं थेट १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं आहे. त्यामुळं मध्यमवर्गीयांची मोठी करबचत होणार असून त्यांच्या हाती अधिक...