Mumbai, मे 29 -- IMD on Heatwave : भारतातील अनेक राज्यांत उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती असून उष्णतेची तीव्रता गुरुवारपासून कमी होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत तापमानात हळूहळू आणखी घट होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे.

आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी आज 'एएनआय'ला ही माहिती दिली. पश्चिम हिमालयीन भागात दिसणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे सध्याची उष्णतेसारखी परिस्थिती येत्या काही दिवसांत बदलण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असंही डॉ. कुमार यांनी सांगितलं.

अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट किंवा लाटेसदृश तापमान आहे. पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश इत्यादी भागात आजही तीव्र उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहील. तिथं रेड अलर्ट ज...