भारत, जानेवारी 23 -- विनापरवाना आणि अनधिकृत होर्डिंगच्या बजबजपुरीमुळे महाराष्ट्रातली अनेक शहरे बीभत्स दिसू लागली आहेत. मुंबई शहरात सुद्धा बेकायदा होर्डिंगचा सुळसुळात झाला आहे. या होर्डिंग, बॅनरविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांसाठी हेल्पलाइन जारी केली आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर मुंबईकर नागरिकांनी संपर्क करून तक्रार नोंदवण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मुंबईक नागरिकांनी १९१६ या टोल-फ्री क्रमांकावर बेकायदा होर्डिंगची तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टोल-फ्री क्रमांकाशिवाय विनापरवाना प्रदर्शित केलेल्या जाहिरात फलकांविरोधात वेबसाइट आणि सोशल मीडियावर सुद्धा नागरिक तक्रार नोंदवू शकतात. मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.mcgm.gov.in आणि समाजमाध्‍यमांवरील @mybmc या फेसबूक आणि ट्विटर ...