Mumbai, फेब्रुवारी 13 -- Hurda Bhel Recipe In Marathi : हिवाळा अर्थात थंडीचा महिना सुरू झाला की,घराघरांत आणि बाजारात हुरडा दिसू लागतो. अनेकांच्या घरात स्पेशल हुरडा पार्टी देखील रंगते. हुरड्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यापैकी हुरडा भेळ ही एक खास महाराष्ट्रातील खास खाद्यपदार्थ मोडते, जी खूपच चवदार तर लागतेच आणि पौष्टिकही असते. हुरडा भेळ पापडी आणि चटपटीत चटणीसह बनवली जाते. हुरडा भेळ सर्व वयाच्या लोकांना आवडते आणि खासकरून कुटुंबाच्या छोट्या गेट-टू-गेदरसाठी नक्कीच बनवली जाते. तुम्ही देखील घरीच हुरडा भेळ बनवण्याचा विचार करत असाल तर रेसिपी लिहून घ्या.

१ कप हुरडा

१ कप कुरमुरे

१/२ कप तळलेले शेंगदाणे

१/४ कप उकडलेला बटाटा

१/४ कप कांदा

१/४ कप टोमॅटो

१/४ कप काकडी

१ चमचा हिरवी मिरची

१ चमचा पाणीपुरी चटणी

१/२ चमचा लाल तिखट

१/२ चमचा चाट मस...