Mumbai, फेब्रुवारी 11 -- Happy Hug Day 2025 In Marathi : व्हेलेंटाईन वीक सुरू आहे आणि व्हेलेंटाईन वीक मधील सहावा दिवस म्हणजेच 'हग डे' होय. हग डे म्हणजे मिठी मारणे, मिठी मारल्याने प्रेमासोबतच जवळीक देखील वाढते. प्रेम वाढवण्यासाठीच नाही तर अनेक आजार व समस्या दूर करण्यासाठी देखील मिठी मारणे लाभदायी समजले जाते.

हग डे च्या दिवशी आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींना प्रेमाची व मायेची मिठी मारली जाते. या दिवशी आपण एखाद्या व्यक्तीवर किती प्रेम करतो, त्याच्याविषयी आपल्याला किती आदर आहे, त्याचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे घट्ट मिठी मारून दाखवण्याची संधी असते. हा दिवस फक्त प्रेमीयुगुलांसाठीच खास नाही. तर या दिवशी आपण कुटुंबातील व्यक्ती, मित्रमैत्रीणी, आयुष्यातील खूप महत्त्वाची लोकं यांना मिठी मारून स्पेशल फिल करू शकता. या हग डे च्या निमित्ताने ...