Mumbai, फेब्रुवारी 4 -- Maharashtra State BoardHSC SSC Exam :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहे तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) २१ फेब्रवारी ते १७ मार्च दरम्यान आयोजित केली आहे. ही परीक्षा पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर, अमरावती,नाशिक,लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत.

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यास व त्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सुविधा उपलब्घ करून देण्यात आली आहे. राज्यमंडळ स्तरावरून...