भारत, फेब्रुवारी 2 -- आज शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी, कालाष्टमीचा चंद्र शुक्राच्या राशीतुन भ्रमण करणार असुन शनिशी नवमपंचम व गुरू-हर्षलशी प्रतियोग करीत आहे. राहुचं नक्षत्र आणि शुल योगात कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

आज लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. मित्रमंडळींचे सहकार्य उत्तम मिळेल. कामाचा ताण वाढला तरी काम सोपे करून घ्याल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. आपल्या स्वभावातील दूरदर्शीपणामुळे कठीण परिस्थिती यशस्वीरित्या हाताळाल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिकदृष्या खुपच उत्तम दिवस आहे. संततीकरिता आजचा दिवस उत्साहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. गुंतवणूक नक्की करावी भविष्यात ही गुंतवणुक आपणास फायदेशीर ठरेल.

आज विद्यार्थ...