भारत, मार्च 12 -- होळीचा रंगीबेरंगी सण साजरा करणे सर्वांनाच आवडते. आपल्यातील अनेक जण स्वतःचे सौंदर्य, व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, म्हणून हेअऱकलर करताना नव्या ट्रेण्डमधील रंग निवडतात. होळी खेळताना केसांवर गुलाल उधळला जातो. केस रूक्ष होतात. हेअरकलर करतानाही केसांचे आरोग्य बिघडते. या दोन्ही गोष्टींचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. होळी साजरी केल्यानंतर तुमचे केस नेहमीपेक्षा जास्त रूक्ष आणि कोरडे झाल्याचे दिसून येते.

होळीत वापरल्या जाणऱ्या रंगांमध्ये बऱ्याचदा रसायने वापरली जातात. या रसायनांचा तुमच्या केसांशी संपर्क आल्यास नैसर्गिक तेल कमी होते, पण काळजी करू नका! होळी साजरी करण्याची तयारी करताना केसांबाबत आवश्यक काळजी घेणे आवश्यक ठरते. होळीत केसांवर रंग लागल्यावर पुन्हा आवश्यक उपाययोजना केल्यास केसांचे आरोग्य आणि चमक टिकून राहते.

योग्य उपच...