Himachal Pradesh, डिसेंबर 8 -- Himachal Pradesh Nivadnuk Nikal 2022: गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत दिसत आहे. सध्याचे कल पाहता काँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप १० जागांवर पुढं आहे. दोन्ही पक्षांमध्ये कमी अंतर राहिल्यास तिथं फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता आहे. भाजपची आतापर्यंतची रणनीती पाहता काँग्रेसचे दिग्गज आधीच सावध झाले आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी 'डॅमेज कंट्रोल'ची जबाबदारी हाती घेतली आहे.

देशातील अनेक राज्यांत भाजपनं केंद्रीय सत्तेच्या बळावर आमदार फोडल्याचे दाखले आहेत. केंद्रात सत्ता असल्यानं भाजपला हे सहज शक्य आहे. त्यातच हिमाचलमध्ये एक-दो...