Mumbai, ऑक्टोबर 7 -- Activities to Keep Heart Healthy: चांगल्या कामांमध्ये गुंतुन राहिल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य चांगले राखता येते. जर तुम्हाला तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर चांगली कृती करा, इतरांना मदत करा. मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी आपल्या चांगल्या कामांचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे स्पष्ट केले.

चांगले काम केल्याने हृदयाच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. संकटात सापडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करणे, हसतमुख राहणे, एखाद्याचे कौतुक करणे, गरजूंसाठी आर्थिक मदत करणे आणि समाजासाठी काम करणे किंवा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम करणे, झाडे लावणे, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना मदत करणे तुम्हाला तुमचे हृदय निरोग...