Mumbai, फेब्रुवारी 9 -- What Not To Eat Thyroid Problems In Marathi : अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या आजारांमध्ये थायरॉईड सर्वात सामान्य आहे. भारतातील दर १० व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. थायरॉईडच्या बाबतीत, काही हार्मोन्स खूप जास्त किंवा खूप कमी तयार होतात.

थायरॉईडचे अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये हायपरथायरॉईडीझम, हायपोथायरॉईडीझम, थायरॉईडायटीस आणि हाशिमोटो थायरॉईडाइटिस यांचा समावेश होतो. हा त्रास टाळण्यासाठी औषधांसोबतच खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थायरॉईडच्या रुग्णाने ज्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्याबद्दल येथे जाणून घेऊया.

क्रूसिफेरस भाज्यांमध्ये गॉइट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला थायरॉइडची समस्या ...