Mumbai, फेब्रुवारी 13 -- Maharashtra Congress New President: महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस समितीने एक मोठा निर्णय घेतला. नाना पटोले यांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले. नाना पटोलेंच्या जागी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे. याशिवाय, विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.

अखिल भारतीय काँग्रेस समितीने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 'काँग्रेस अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी तात्काळ नियुक्ती केली आहे. माजी अध्यक्ष नाना पटो...