Mumbai, एप्रिल 23 -- पवनपुत्र भगवान हनुमानाची जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते. चैत्र महिन्यात आज मंगळवार २३ एप्रिल २०२४ रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे.

हनुमान जयंतीचा दिवस राम भक्त आणि हनुमान भक्त दोघांसाठी खूप खास आहे. देशभरात लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. पण काही लोक याला हनुमान जयंती म्हणतात तर काहीजण हनुमान जन्मोत्सव असेही म्हणतात. या दोघांमध्ये काय फरक आहे आणि काय म्हणणे योग्य आहे? याबाबत लोकांमध्ये संभ्रम कायम आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

हनुमानाच्या जन्मदिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणणे योग्य ठरेल, असे तज्ञांचे मत आहे. कारण जयंती आणि जन्मोत्सव म्हणजे वाढदिवस असू शकतो. परंतु जयंती अशा व्यक्तीसाठी वापरली जाते जे हयात नाही. परंतु जेव...