भारत, मार्च 19 -- Hanuman Chalisa : हिंदू धर्मात बजरंगबली हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मंगळवार हा भगवान श्री रामाचेा महान भक्त हनुमानजींना समर्पित मानला जातो. हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात. अशा स्थितीत त्यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. तसेच, रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला जीवनात प्रचंड लाभ मिळू शकतात.

Hanuman Jayanti 2024 Date : हनुमान जयंती कधी आहे? नेमकी तारीख, पूजेची वेळ, पूजेची पद्धत जाणून घ्या

दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला राम भक्त हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारे मोठे संकटही दूर होते. याशिवाय असे मानले जाते की हनुमान चालिसाचे रोज पठण केल्याने कुंडलीतील राहू आणि केतू दोषांसह मंगळ दोषापासून मुक्ती मिळते.

हनुमान चालिसामध्ये वर्णन केल्...