Mumbai, डिसेंबर 6 -- Ways to Grow Hair Strong: केसांच्या वाढीसाठी अनेकदा खूप वेगवगेळ्या पद्धतींचा अवलंब करतात. यामध्ये अनेक केमिकलयुक्त साहित्याचा वापर केला जातो. यामुळे केसांची वाढ होण्यापेक्षा त्याचे नुकसानच होते. हे अनेकदा लोकांना माहीत नसते. अशा परिस्थितीत पाण्यात काही गोष्टी मिसळून केस धुतले तर केसांची वाढ तर होतेच पण केसांना नुकसान होण्यापासूनही वाचवता येते. कोणत्या पाण्याने केस धुतल्याने केस सुंदर होतील आणि त्याची ग्रोथ होईल. हे जाणून घ्या...

हे उपाय करा

१) जवसाच्या पाण्यात व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन दोन्ही मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणूनच तुम्ही जवसाच्या पाण्याने केस धुतल्यास केसांची वाढ होऊ शकते. तुम्ही २ चमचे जवस दोन ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि रात्रभर भिजवल्यानंतर ते गाळून घ्या आणि दुसऱ्या दिवशी केस धुवा. असे केल्याने केसांच्या ...