Mumbai, फेब्रुवारी 12 -- Guru Pratipada : श्री गुरूप्रतिपदा व गुरुवार दुग्ध शर्करा असा योग असून, १३ फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण प्रतिपदेला साजरा केला जात आहे. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. या दिवशी गुरुस्मरण केल्याने आणि गुरुचरित्र पारायण केल्याने अनेक पटींनी पुण्य फळ लाभेल असे सांगितले जाते.

श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते.

गुरुप्रतिपदा या तिथीला भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पा...