Mumbai, जानेवारी 28 -- Guru Gochar 2025 In Marathi : देवगुरु गुरु ४ फेब्रुवारी रोजी वृषभ राशीत प्रतिगामीतून मार्गस्थ होईल. गुरूच्या मार्गी हालचालीचा परिणाम मेष ते मीन राशीवर होईल. गुरूच्या हालचालीमुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक, व्यावसायिक आणि भौतिक लाभ मिळतील. पंचांगानुसार, गुरू ग्रह ४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ९ मिनिटांनी मार्गी होईल, ज्योतिषीय गणनेनुसार, गुरु ग्रह सुमारे ११९ दिवसांनंतर मार्गी दिशेने जाणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना गुरूच्या मार्गी हालचालीमुळे जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळणार आहे.

मेष राशीच्या दुसऱ्या स्थानी आणि धन स्थानी बृहस्पती मार्गी होत आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांसंबंधीचे प्रश्न सुटतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मालमत्तेशी संबंधित प्रकरणेही सुटू शकतात. व्यावसायिक प्...