Mumbai, जानेवारी 30 -- Gupt Navratri 2025 : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून गुप्त नवरात्रीची सुरुवात होईल. यानिमित्ताने नऊ दिवस मातेचे भक्त विशेष पूजा करणार आहेत. या नवरात्रात तंत्र-मंत्र आणि सिद्धी प्राप्तीसाठी भक्त देवीच्या विविध रूपांची विशेष पूजा करतात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात ३० जानेवारीपासून सुरू होणारी ही नवरात्र ७ फेब्रुवारीला संपणार आहे.

नवरात्र सनातन धर्मात वर्षातून चार वेळा साजरी केली जाते. चैत्र आणि आश्विन महिन्यात साजरी होणारी नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी होते. तर माघ महिना आणि आषाढ महिन्यात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रीला गुप्त नवरात्र असे म्हणतात.

हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २९ जानेवारीला संध्याकाळी ६.०२ वाजता सुरू होईल. तर ३० जानेवारीला संध्याकाळी ४:०७ वाजता संपेल....