Mumbai, नोव्हेंबर 28 -- Corporate Donations For Political Partys In Gujarat Assembly Elections : सध्या गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुणाळी सुरू आहे. गेल्या २७ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपनं पुन्हा विजय मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं आहे. तर कॉंग्रेस आणि नवख्या आम आदमी पक्षानंही गुजरातमध्ये विजयासाठी कंबर कसली आहे. परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक कॉर्पोरेट देणग्या मिळाल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. त्यामुळं आता भाजपकडून गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतील प्रचारात सर्वाधिक पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं जारी केलेल्या रिपोर्टनुसार, २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या काळात भाजपला गुजरातमध्ये तब्बल १६३.५४ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट फंड मिळाला आहे. त्यानं...