New delhi, जानेवारी 27 -- गुलियन बॅरे सिंड्रोम ( जीबीएस)ची प्रकरणे हाताळण्यासाठी राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय आणि बहु-विषयक पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, जीबीएसच्या संशयित आणि पुष्टी झालेल्या प्रकरणांमध्ये वाढ लक्षात घेता राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सल्ला देण्यासाठी आणि मदतीसाठी तज्ञांचे एक पथक पुण्यात पाठविण्यात आले आहे.

पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) थैमान सुरू असून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुण्यातील DSK विश्व मध्ये राहणाऱ्या तरुणाचा GBS ची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तो तरूण मूळचा सोलापूरचा असल्याचे समजते.

पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णांवर होणार मोफत उपचार! कमला न...