Mumbai, जानेवारी 26 -- Guillain-Barre Syndrome Outbreak: पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आली आहे. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएसची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. मृत रुग्णाला काही दिवसांपूर्वी जुलाबाचा त्रास सुरू झाला. सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत रुग्ण पुण्यातील डीएसके विश्व धायरी परिसरात राहायला होता. मयत रुग्ण एका खाजगी कंपनीत सनदी लेखपाल म्हणून नोकरी करत होता. तो पु्ण्यात असताना ११ जानेवारी रोजी त्याला जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काही कार्यक्रमानिमित्त तो सोलापुरात त्याच्या गावी गेला. परंतु, सोलापुरात गेल्यानंतर अशक...