Mumbai, एप्रिल 9 -- Gujarat Titans vs Rajasthan Royals Todays Match : आयपीएल २०२५ चा २३ वा सामना आज (९ एप्रिल) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्णधार संजू सॅमसन म्हणाला, की त्यांचा संघ या सामन्यात एका बदलासह आला आहे. वैयक्तिक कारणांमुळे वानिंदू हसरंगा खेळत नाहीये, त्याच्या जागी फजलहक फारुकी याला संधी मिळाली आहे. त्याच वेळी, गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.

गुजरात टायटन्स: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशा...