Mumbai, मार्च 29 -- MI vs GT IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये आज (२९ मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या मोसमातील पहिला विजय शोधत आहेत. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यातून पुनरागमन करत आहे.

हार्दिक चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. कारण गेल्या मोसमात स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. आता कर्णधार हार्दिक पुनरागमन करणार आहे, परंतु प्रश्न असा आहे की त्याच्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून कोणत्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल?

हार्दिक पांड्या साधारणपणे पाचव्या ते सातव्या स्थानावर फलंदाजी करतो. CSK विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनचे संयोजन पाहिल्यास, संघ व्यवस्थित दिसतो. हार्दिक पांड्या सं...