भारत, मार्च 30 -- आयपीएल २०२५ चा ९ वा सामना (३० मार्च) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरातने मुंबईचा ३६ धावांनी धुव्वा उडवला.

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला २० षटकांत केवळ १६० धावाच करता आल्या.

मुंबईकडून रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप झाला, तो ८ धावा करून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. तर दुसरा सलामीवीर रायन रिकेल्टन हाही ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर सूर्यकुमार यादव (४८) आणि तिलक वर्मा (३९) यांनी ६२ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सांभाळला. हार्दिक पंड्या अखेरपर्यंत चांगली खेळी खेळून संघाला विजय मिळवून देईल, अशी अपेक्षा होती, मात्र, त्याने अननुभवी रॉबिन मिन्झला त्याच्याआधी फलंद...