Mumbai, जानेवारी 29 -- Comrade Govind Pansare Murder Case :कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी जामीनावर बाहेर आले आहेत. हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय. गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बट्टी, भरत कुराणे आणि वासुदेव सूर्यवंशी या आरोपींनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. २०१८ आणि २०१९ मध्ये आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहात आहेत. आता त्यांना जामीन मंजूर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

गोविंद पानसरेहत्येनंतर ३ ते ४ वर्षानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. २०१८-१९ पासून आरोपी कारागृहात ...