भारत, डिसेंबर 8 -- या वर्षाचा (२०२२) शेवटचा महिना सुरू झाला आहे. म्हणजे, या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली आहे. क्रीडा जगताबद्दल बोलायचे झाले तर, हे वर्ष संस्मरणीय ठरले आहे. या वर्षात आपल्याला टी-२० विश्वचषक पाहायला मिळाला आणि आता फिफा विश्वचषकाचा थरार सुरू आहे. अशातच आता सर्च इंजिन गुगलने २०२२ मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या कीवर्डची यादीही जारी केली आहे. यामध्ये यावेळी क्रिडा जगताचा दबदबा दिसून आला आहे.

विशेष म्हणजे २०२२ मध्ये खेळाशी संबंधित अनेक कार्यक्रमांनी भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याची सुरुवात आयपीएलने झाली, त्यानंतर टी-२० विश्वचषक, महिला विश्वचषक, फिफा विश्वचषक, आशिया चषक, विम्बल्डनसह इतर अनेक मोठ्या स्पर्धांचा समावेश आहे.

गुगलने वर्षभरात भारतात सर्च केलेल्या मोठ्या कीवर्डची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये टॉप-१०...