Mumbai, जानेवारी 26 -- Indian Republic Day 2025: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गुगलने खास डूडल तयार केले आहे, ज्यात भारतीय वन्यजीव विषयक चित्रण आहे, जे देशाच्या समृद्ध जैवविविधतेवर प्रकाश टाकते. भारतातील वैविध्यपूर्ण वन्यजीवांपासून प्रेरणा घेऊन गुगल डूडलमध्ये उत्तरेतील बर्फाळ हिमालयापासून ते दक्षिणेकडील पश्चिम घाटातील घनदाट वर्षावनांपर्यंत देशाच्या विविध प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे प्राणी दाखवण्यात आले आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे चित्रण करणारी ही कलाकृती पुण्यातील पाहुणे कलाकार रोहन दाहोत्रे यांनी तयार केली आहे, अशी माहिती गुगल डूडल इन्फो पोर्टलने दिली आहे. परेडमधील प्राणी भारताच्या प्रदेशांच्या अद्वितीय विविधतेचे प्रतीक आहेत.

प्रजासत्ताक दिनसोहळ्याचे महत्त्व स्पष्ट करताना गुगलने वार्षिक परेडवर प्रकाश टाकला,...