Delhi, फेब्रुवारी 14 -- Google Chorme News : गुगल क्रोम वापरणाऱ्या युजर्ससाठी भारत सरकारशी संबंधित कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) या एजन्सीने मोठा इशारा दिला आहे. जर तुम्ही गुगल क्रोम इंटरनेट ब्राउजर वापरत असाल तर तुम्हाला काजळी व सतर्क राहावे लागणार आहे. विशेषत: विंडोज किंवा मॅकओएसवर गूगल क्रोम ब्राउझर वापरणाऱ्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे.

सीईआरटी-इनने आपल्या बुलेटिनमध्ये गुगल क्रोम वापरकर्त्यांनी कोणत्या डिव्हाइसेसपासून सावध राहण्याची गरज आहे आणि कोणत्या त्रुटींमुळे क्रोम वापरण्यास धोका होय शकतो या बाबत इशारा दिला आहे. चुकीच्या पद्धतीने एक्सटेंशन एपीआय लागू केल्याने आणि फ्री इन स्किया, व्ही ८ वापरल्यामुळे गुगल क्रोममध्ये अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. सायबर हल्लेखोर व घोटाळेबाज या क्रोममधील त्रुटींचा फायदा घेऊ शकतात....