Mumbai, एप्रिल 15 -- Google told user security mistakes : जगभरात सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर चोरटे यूझर्सची वैयक्तिक माहिती चोरून त्यांच्या बँक खात्यावर देखील डल्ला मारत आहेत. ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षणीय वाढला असून सायबर चोरटे आता नवनवीन पद्धतीने फसवणूक करत आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करतांना केलेली एक छोटीशी चूक तुमची वैयक्तिक माहिती लीक करू शकते. ज्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. गुगलही या धोक्याबद्दल अलर्ट केले असून यूझर्सच्या सामान्यपणे करत असलेल्या चुका देखील सांगितल्या आहेत, ज्यामुळे ऑनलाइन स्कॅमचा धोका लक्षणीय वाढतो.

गुगलच्या साइन-इन सुरक्षेचे वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक श्रीराम करार म्हणाले की, वापरकर्त्यांना तोच पासवर्ड पुन्हा पुन्हा वापरण्याची सवय सोडावी लागणार आहे. जीमेल खात्याच्या सु...