Mumbai, डिसेंबर 6 -- Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झाले होते. याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्त्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. आज मुंबई येथे महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक चैत्यभूमी येथे जमले आहे. या खास दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आपण शिक्षा घेतली पाहिजे. म्हणूनच आम्ही आज तुमच्या सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...