Mumbai, फेब्रुवारी 9 -- १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले, त्यांपैकी श्री ब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. महाराष्ट्रातील एक संत, सत्पुरुष अशी ख्याती असणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आज तिथीनुसार जयंती आहे.

वारकरी कुटुंबात रावजी आणि गीताबाई या जोडप्याचे पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इसवीसन १९ फेब्रुवारी १८४५ ) या दिवशी श्री महाराजांचा जन्म झाला. पाळण्यात त्यांचे नाव गणपती असे ठेवण्यात आले. गणपतीने गुरुजींकडून अल्पावधीतच विद्या आत्मसात केली. पण, अध्यात्माच्या ओढीने नवव्या वर्षीच दोन सोबत्यांसह बाल गणपती यांनी गुरू शोधण्यासाठी घर सोडले.

लहानपणापासूनच श्रीरामपरायण केल्यामुळे सद्गुरूची ओढ त्यांना लागली व गुरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी घराबाहेर पडले. ...