भारत, मार्च 5 -- Gold Silver Rate Today : लग्नकार्यासाठी सोने-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या सर्वसामान्यांची निराशा करणारी बातमी आहे. सराफा बाजारात आज सोन्याच्या भावानं नवा उच्चांक नोंदवला आहे. सोने तोळ्यामागे ६४,४०४ रुपये झालं आहे. इतकं महाग सोनं याआधी कधीच नव्हतं. चांदीनंही रंग दाखवला असून चांदीच्या दरात १२६१ रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबई (Mumbai), दिल्ली, कोलकाता, गोरखपूर, लखनौ, जयपूर, इंदूर, जयपूर आणि पाटणा यासह सर्व शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोमवारच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोने थेट ९२४ रुपयांनी महागलं आहे. प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव ६४,४०४ रुपयांवर खुला झाला.

RBI bars IIFL : आयआयएफएल फायनान्सला आरबीआयचा दणका! गोल्ड लोन देण्यास बंदी

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) च्या नवीन दर...