Mumbai, एप्रिल 12 -- Gold Silver Price Today : ऐन लगीन सराईत सोने आणि चांदीचे दर नवनवे उच्चांक गाठत आहेत. सोन्याचा दर एका तोळ्यामागे जवळपास ७३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीची चमकही सातत्यानं वाढत असून चांदी ८४ हजारांपर्यंत गेली आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) पाठोपाठ सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरानं उसळी घेतली आहे. आज, शुक्रवारी सोने प्रति १० ग्रॅम ११२२ रुपयांनी महागले आणि ७२,९६७ रुपयांचा नवा उच्चांक गाठला. तर, चांदीचा भाव १,२६२ रुपयांनी झेप घेत ८३,६०५ रुपयांवर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये सोने तोळ्यामागे तब्बल ५,७१५ रुपयांनी महाग झालं आहे. तर, चांदीच्या दरात किलोमागे ९४७८ रुपयांची वाढ झाली आहे.

हेही वाचा: 'या' दोन नव्या रंगात आयफोन १६ बाजारात दाखल होणार, लॉन्चिंगपूर्वीच माहिती लीक!

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA...