Mumbai, एप्रिल 15 -- Gold Silver Price Today : इस्रायल आणि इराण यांच्यात अचानक उद्भवलेल्या तणावाचा सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून नवनवे विक्रम करणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित घट झाली आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने ४४२ रुपयांनी स्वस्त झाले तर, चांदी किलोमागे ३१३ रुपयांनी स्वस्त झाली.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) नव्या दरानुसार, २४ कॅरेट सोने ७२,७३२ रुपयांवर उघडले आज चांदीचा भाव ८३,५०६ रुपयांवर उघडला. आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ४४० रुपयांनी घसरून ७२४४१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४०३ रुपयांनी कमी होऊन १० ग्रॅम ६६,६२३ रुपयांवर आला आहे. १८ कॅरेट सोन्याचा भावही आज ३३२ रुपयांनी घसरून ५४५४९ रुपयांवर आला. तर, १४ कॅरेट सोन्याचा भाव २५९ रुपयांनी घसरून ४२५४८ ...