Mumbai, एप्रिल 22 -- लग्नसराईचा हंगाम आणि अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. दिल्लीच्या किरकोळ बाजारात मंगळवारी पहिल्यांदाच सोन्याचे दर १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचले. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. सोमवारी त्याची किंमत ९६६७० रुपये होती. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव १०,६९९ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव आज ९५,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे सोन्याचा वायदा भाव मंगळवारी सलग चौथ्या सत्रात वधारला आणि १,८९९ रुपयांनी वधारून ९९,१७८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. तसेच, ऑक्टोबर कॉन्ट्रॅक्टने एमसीएक्सवर प्रथमच एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आण...