Mumbai, जानेवारी 27 -- Venus Transit: २९ तारखेला शुक्राची राशी बदलणार आहे. शुक्र आता ४ महिने मीन राशीत राहील. राहू देखील या राशीत आधीच विराजमान झालेला आहे. अशा तऱ्हेने शुक्र आणि राहू ४ महिने एकत्र राहिल्याने कोणत्या राशींवर परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २९ जानेवारी २०२५ रोजी बुधवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत जात आहे. शुक्र हा मीन राशीत गेल्याने याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. पण राहू आधीच या राशीत विराजमान आहे. राहू या राशीत असल्याने शुक्र आणि राहू आता पुढील चार महिने एकत्र राहणार आहेत. याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये राहूचे मीन राशीत गोचर झाले होते. अशा तऱ्हेने धन आणि वैभव देणारे शुक्र आणि राहू काही राशींना लाभ देणार आहेत, तर काही राशींना त्रास देखी...