Mumbai, फेब्रुवारी 2 -- Geeta Updesh In Marathi : प्रत्येक नवीन दिवस काही आव्हाने आणि संघर्ष घेऊन येतो. जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले तर तुम्ही या संघर्षांना आणि आव्हानांना अगदी सहज सामोरे जाऊ शकता. पण, योग्य मार्गदर्शन कुठून मिळणार आणि कोण देणार हा प्रश्न मनात निर्माण होतो. याचे उत्तर भगवान श्रीकृष्ण आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणात श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्या शिकवणीच्या मदतीने मार्गदर्शन केले. तीच श्रीमद भागवत गीता तुम्हालाही जीवनात मार्गदर्शन करेल. जो माणूस भगवद्गीता नीट वाचतो, त्याचे मन आयुष्यभर भटकत नाही. अशा परिस्थितीत, गीतेचे कोणते उपदेश तुम्हाला प्रेरित ठेवतील हे जाणून घेऊया.

> श्रीमद भागवत गीतेमध्ये असे लिहिले आहे की, बदल कसे स्वीकारायचे हे माणसाला कळले पाहिजे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल प्रत्येक परिस्थितीत होतो आणि या ब...