Mumbai, फेब्रुवारी 18 -- Geeta Teachings In Marathi : श्रीमद्भगवद्गीतेला उपनिषदांचे सार म्हटले आहे. भगवद्गीतेमध्ये दिलेल्या शिकवणी आपल्याला योग्य पद्धतीने जीवन कसे जगायचे हे शिकवतात. जर, तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर गीतेच्या या ५ शिकवणी लक्षात ठेवा. या शिकवणी तुम्हाला केवळ करिअरमध्येच नव्हे तर वैयक्तिक जीवनातही यशस्वी होण्यास मदत करतील. हे तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून ताणतणाव टाळण्यास आणि नैराश्यात जाण्यापासून दूर ठेवण्यात देखील मदत करतील.

जर तुम्ही एखाद्या गोष्टीशी, एखाद्याशी किंवा यश मिळवण्याशी खूप जोडलेले गेलेले असाल, तर हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. गीतेत, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला उपदेश केला की, जास्त आसक्ती माणसामध्ये राग आणि निराशा निर्माण करू शकते. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला ती गोष्ट मिळत नाही, ...