Mumbai, फेब्रुवारी 8 -- Mumbai GBS News: मुंबईत गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या दुर्मिळ आजाराचा पहिला पहिला रुग्ण आढळला आहे. अंधेरी पूर्व परिसरीसरातील एका ६४ वर्षीय महिलेचे चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णावर सध्या पालिकेच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. या महिलेला ताप आणि जुलाबाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात प्रमुख्याने पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, आतापर्यंत एकूण १७३ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १४० र...