MUmbai, फेब्रुवारी 12 -- Mumbai GBS Update : राज्यात गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)चा कहर सुरूच आहे. आता मुंबईत हा आजार पसरत असून या आजाराने ग्रस्त असलेल्या ५३ वर्षीय रुग्णाचा बुधवारी मुंबईत मृत्यू झाला. जीबीएसमुळे मृत्यू झालेला हा मुंबईतील पाहिला तर राज्यातील आठवा मृत्यू आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. यापूर्वी मंगळवारी पुण्यातील ३७ वर्षीय वाहनचालकाचाही जीबीएसमुळे मृत्यू झाला होता.

मुंबईत गेल्या शुक्रवारी जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला. येथे एका ६४ वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निदान झाले होते. या रुग्णावर महापालिकेच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त आणि राज्य नियुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.

बीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी...