भारत, जानेवारी 29 -- Guillain Barre Syndrome:जी बी सिंड्रोमने पुण्यासह राज्यभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.पुण्याबरोबरचनागपूर,सोलापूर,कोल्हापुरातही जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. आज पुण्यात जीबीएसचा पहिला बळी गेला आहे. सिंहगड परिसरात एका ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यात आज(२९ जानेवारी) नवीन १६ जीबीएस रुग्णांची नोंद झाल्याने एकूणरुग्णांची संख्या १२७ वर गेली आहे.

पुण्यात आज जीबीएसमुळे पहिला बळी गेला असून सिंहगड परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती व १५जानेवारीपासून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. याआधी सोलापूर येथील एकाचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. पुणे विभागात जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. पुण्यात सध्या जीबीएसचे १२७रुग्ण असून त्यांच्यावर तज्ज्ञांच्य...